Reply – चवळीची शेंग
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
चवळीची शेंग
— by nilesh dattaram bamne nilesh dattaram bamne
चवळीची शेंग
कशी देऊ ग उपमा तुला त्या भोपळ्याची
दे उत्तरे तू आज मला काही प्रश्नांची
तूच होतीस का ती सरळ शेंग चवळीची
डोळ्यात मावणारी बरणीच लोणच्याची
तूच होतीस का ती परी कृष्ण रंगाची
आवड होती जिला सुंदर दिसण्याची
तूच होतीस का ती सवयच होती जिची
विनाकारण भोवती माझ्या घुटमळ्ण्याची
तूच होतीस का ती मुर्ती अधूनिकतेची
आवड होती जिला मोकळ्च राहण्याची
तूच होतीस का ती लहर एक उत्साहाची
जी माझ्या हृद्याला सतत स्पर्शून जायची
गरज होती का तुला लपूनी राहण्याची
जर होतीस ग राणी तू माझ्या हृद्याची
कवी- निलेश बामणे ( एन.डी.)