Reply – मी
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
मी
— by nilesh dattaram bamne nilesh dattaram bamne
मी
मी असा कसा वेडा जगा वोगळा झालो
मिसळूनही सार्या त सुकाच कसा राहिलो
हृद्य दाटून आले तरी नाहीच रडलो
कोरडा होतोच मी कोडगा हल्ली झालो
ज्ञान ते जमवून मी घोळूनही प्यायलो
सत्याच्याच त्या उलट्या आता करू लागलो
माझी बुध्दी मीच ती झाकून उगा बसलो
भोवताळ्च्या जगी गाढव म्ह्णून ठरलो
पैसा नाही खिशात म्ह्णून कासव झालो
संसार करण्या जगी मी नालायक ठरलो
जन्मा आलो एकटाच म्ह्णून एकटा जगलो
जाणारही एकटाच म्ह्णून एक राहिलो
कित्येकांच्या प्रेमात अपघाताने पडलो
प्रेमावर बळी मात्र मी स्वतःहून गेलो
निरर्थक या जगी मी उगा जन्माला आलो
अर्थशून्य जगण्याचा  अर्थ शोधत राहिलो
कवी – निलेश बामणे ( एन.डी.)