Reply – शून्य
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
शून्य
— by nilesh dattaram bamne nilesh dattaram bamne
शून्य
आता मी माझ्या वेदना, माझी दुःखे
कोणालाच सांगत नाही कारण आता
कोणी माझा उरलाच नाही...
जगायचे ठराविले आहे जर मी फक्त स्वतःसाठी
तर जगाची दुःखे गोंजारण्यात
आता काही अर्थच उरलाच नाही...
कोणाच्या प्रेमात पडण्यात आता मला किंचिंत ही रस नाही
कारण आता कोणाचं प्रेम ठेवायला
माझ्या हृद्यात मोकळा कप्पा उरलाच नाही...
धावता- धावता जीवनात माझ्या इतका पुढे निघून गेलो
की मागे वळून पाहता माझ्या मागे
कोणी स्पर्धक उरलाच नाही...
शून्याचा शोध घेण्यात माझे जीवन वाया गेले
शून्याचा शोध लागला तेंव्हा माझ्या जीवनात
शून्यही उरलाच नाही...
कवी – निलेश बामणे.