Reply – गारपीट ग्रस्त
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
गारपीट ग्रस्त
— by nilesh dattaram bamne nilesh dattaram bamne
गारपीट ग्रस्त
निसर्गाच्या लहरीपणाचा मला आता
खरोखरच खुप राग आलाय
त्याला जर गारपीटांचा मारा करायचाच होता
तर तो निदान श्रीमंतांच्या मुंबईत तरी करायचा
म्हणजे गरीब शेतकर्यांच्या आत्महत्या तरी टळ्ल्या असत्या...
मुंबईकरांना काश्मिरात जाऊन आल्याचा
आनंद घरबसल्याच मिळाला असता
कोणालाच कोणाकडे मदतीसाठी मदतीचा
हात मागावाच लागला नसता...
ऐन निवडणूकीत राजकारण्यांच्या
डोक्याला ताप झालाच नसता
खोट्या आसवांचा आणि आश्वासनांचा
बाजार मांडला गेलाच नसता...
प्रसारमाध्यमांनी विनाकारण तिच ती दृष्ये
पुन्हा-पुन्हा दाखविण्याचा उद्योग केलाच नसता
गारपीटांखाली चिरडलेली शेतकर्यांची स्वप्ने
शोधण्यापेक्षा गारपीटात दडलेला गारवा
शोधण्यात त्यांना अधिक उत्साह वाटला असता.
म्ह्णूनच कदाचित मुंबईकर निसर्गाच्या
या लहरीपणावर रूसला असावा
आणि त्याला गारपीट्ग्रस्त शेतकर्याच्या
हृद्यात बोचलेला काटा तितकासा दिसला नसावा.
कवी- निलेश बामणे.