Reply – सावरुन घ्यावे स्वत:ला
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
सावरुन घ्यावे स्वत:ला
— by Kiran Kshirsagar Kiran Kshirsagar
सावरुन घ्यावे स्वत:ला

उपभोगुन सारी सुखे
मी तृप्त झालो आता
अधिक नको अपेक्षा
कसली माझ्या मनाला

जग हे लोभसवाणे
मोह सुटेना त्याचा
म्हणुन थांबुन घेतो
आस मनी न धरता

उपेक्षा कुणी करावी
येथे उगाच आपली
त्याआधी आपण आपले
सावरुन घ्यावे स्वत:ला

शक्य होता होईल
दुबळ्यास आधार द्यावा
अन्‌ फावल्या वेळेला
गोडवा प्रभुचा गावा.

         किरण क्षीरसागर