Reply – रस्ता
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
रस्ता
— by Kiran Kshirsagar Kiran Kshirsagar
    रस्ता
रस्ता कसाही असो
रुंद वा अरूंद असो
चढाचा वा उताराचा
खाच खळग्यांचा असो
अथवा असो राजमार्ग
काम त्याचे एकच मात्र
उद्दिष्टांकडे नेण्याचं.

रस्ता कधी कुणाला
जात,धर्म पुसत नाही
रस्ता कधी कुठे
दीन दुबळा पाहत नाही
रस्ता मात्र सर्वांना
उद्दिष्टांकडे अचूक नेई.

नाव त्याचे दुसरे "मार्ग"
आपल्या कामी नेहमी गर्क
मात्र आपणच कधी कधी
त्यावरुन भान हरवुन चालतो
आपणच त्याचे नियम मोडतो
उगाचच कुठेही भरकटतो

किरण क्षीरसागर