Reply – दूरचे दिवे
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
दूरचे दिवे
— by Kiran Kshirsagar Kiran Kshirsagar
    दूरचे दिवे

दूरचे दिवे
स्पष्ट अजून दिसत नाही
अंधाराचे जाळे
डोळ्यासमोरुन हटत नाही
ठाऊक आहे वाट जरी
पडत झडत ठेचा खात
चालत जाईन अंधारात
तिथे जाण्या अगोदर
विझुन गेले दिवे तर?
त्या भयान अंधारात
मार्ग पुढील शोधू कसा?

काळोखात असंख्य जखमा
गोंजारताही येणार नाही
गोंजारल्या हळुवार जरी
अधिकच चिघळल्या जातील
जीवनातील दु:खाची दरी
अधिकच खोलवर जाईल
दूरच्या दिव्यांचा प्रकाश
भेटेलच असे नाही
दूरच्या दिव्यांचा ध्यास
तरी मात्र सुटत नाही

       किरण क्षीरसागर.