Reply – सत्य
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
सत्य
— by Kiran Kshirsagar Kiran Kshirsagar
     सत्य

साथ कुणाची
सुटणार आहे
सावली प्रितीची
मिटणार आहे
त्या जाणिवेने.....
खचलो आहे अर्धा
ती स्पष्ट झाल्यावर
खचून जाईन पुरता

स्वप्नातही कधी
वाटले नव्हते असे
सत्याचेच आता
उमटले आहे ठसे
सत्य स्विकारणे
चूकणार नाही
खचून गेल्याने
जराही त्राण नाही

स्वप्नाळू वृत्तीमुळे
जाणीव झाली नव्हती
सत्याची पाळेमुळे
खोलवर रुजली नव्हती
कुणाच्या सुखाची पहाट
उगवत असेल तर......

त्या सुखाची वाट
नाही मी अडवणार
खचित झालेले मन
एकवटेल अनेकदा
दु:खी कष्टी मन
खोटेच हसविन एकदा

          किरण क्षीरसागर.