Reply – मन माझे
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
मन माझे
— by Sameer Nikam Sameer Nikam

मन माझे झाले वेडे तुझे,
मनाच्या खोलीत गाते गाणे तुझे

तू समोर नसताना होते मन वेडे पिसे
जाणाऱ्या पावूल वाटेवर शोधे तुझे ठसे

चारही दिशा शोधी तुला नयन माझे
तू नाही  जवळ म्हणून येई भरून उर माझे

तुझ्या प्रेमाच्या स्पर्शाला  माझे तन मन तरसे
जसा रात्रीच्या काळोखात विजा सहित पाणी बरसे

मन माझे फिरे सैरा वैरा वाऱ्यासारखे
जसे भटकते पोर आईविना वेड्यासारखे

मन माझे तरसे तुझ्यासाठी
जसे मोर पाउसाच्या पहिल्या थेंबासाठी
मन माझे तुझ्यासाठी नाचते
जसे नदी डोंगरातून बेभान होऊन वाहते

मन माझे करे जगणे कठीण
जसे वाटे मला तुझविन व्यर्थहीन जीवन