Reply – रात्र वैऱ्याची
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
रात्र वैऱ्याची
— by Sameer Nikam Sameer Nikam
हि रात्र आहे  वैऱ्याची
नाही मला सोबत कुणा मित्राची

मनात दाटते भीती भुताची
पटकन नावे घेतो मी देवाची

मनाच्या कोपरयात आवाज करती  पायातील घुंगरू
डोक्यावरून चादर घेण्यास होते मग धडपड सुरु

खोटे स्मित हास्य आणतो मी ओठावर
तरीही का वाटे खोलीत भूतांचा वावर

रात्री मांजरीच्या रडण्याचा आलाय आता कंटाळा
मनात घर करतेय भुतांच्या गोष्टीचा जाळा

निरव शांतता झाली खोलीत
रात्र किडा मधेच किलबिल करीत

आतुरतेने पाहतोय वाट सकाळच्या पहिल्या सुर्यकिर्नाची
काही केल्या भीती जाईना भित्र्या मनाची

नाही दाखवत भीती चेहऱ्यावरची
कारण माहितेय मला..
आत्मा भटकते इथे बाजूच्या काकूंची