Reply – स्वप्न आणि वास्तवता
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
स्वप्न आणि वास्तवता
— by Kiran Kshirsagar Kiran Kshirsagar
         स्वप्न आणि वास्तवता

स्वप्नांच्या दुनियेतील मी एक राजकुमार
स्वप्नांच्या नगरीतील स्वच्छंद माझा कारभार
मनातल्या ईच्छांचा मीच करी घोषवारा
इतरांच्या म्हणन्याचा वाजवायचो बोजवारा
स्वप्नातल्या जगण्यात बंध नव्हते काही
तिच समजुन जीवनज्योत कुठे थांबलो नाही
स्वप्नात स्वप्नपरी सुंदर भेटली होती
प्रेमगाठ दोघांनी उरी घट्ट बांधली होती
स्वप्नांच्या दुनियेत अढळ विश्वास होता
मधुर प्रेम क्षणांत निराळाच आनंद होता
स्वप्नामध्ये चालत चालत खुप दुर आलो
एकमेकांच्या मनात खोलवर शिरत गेलो
सर्वस्व तिज देऊ केले स्वामी मज मानु लागली
प्रेम खुप देऊ केले भावनावश होऊ लागली
पुसटशीही कल्पना नव्हती कधी मनाला
आपण तिची भावना नेणार आहे विकोपाला
स्वप्नातल्या दुनियेतुन वास्तवात आणले कुणी
वास्तवात डोकाऊन पाहिले मीही मनोमनी
स्वप्न अंत होणार आता कळून चुकले होते
स्विकारण्यास सत्यता मन तयार होत नव्हते
काय आहे वास्तवता पडताळून पाहिली
हळूवार मग सत्यता मनास पटू लागली
जीवनात सारे सुख नाही देऊ शकणार
मग अति दु:ख तिला का बरे देणार ?
स्वप्न अंत स्वत:हुन जाणीवपूर्वक करुन घेतला
तिच्या सुखाच्या दृष्टिकोनातून मी प्रेमत्याग केला
शल्य अपराधीपणाचे बोचत राहिल मनाला
दु:ख अपार विरहाचे जाळत जाईल देहाला

                        किरण क्षीरसागर