Reply – निसर्गाचे ऋण
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
निसर्गाचे ऋण
— by Kiran Kshirsagar Kiran Kshirsagar
  निसर्गाचे ऋण

गोंडस फुलांची बाग इथे
स्वच्छ मोकळी हवा इथे
रिमझिम पाऊस धारा इथे
मऊ मखमली हिरवळ इथे
परंतू तुझ्याविना
सुगंध फुलांचा येतच नाही
स्वच्छ हवाही बाधत नाही
पाऊस धाराही झेलत नाही
मऊ हिरवळीवरही जात नाही
तुझ्याच विचारांत गढून जातो
खिन्न मनाने बसुन राहतो
स्वत:हुन झुकतात गोंडस कळ्या
मदतीला घेऊन हवेस मोकळ्या
जणू माझी समजूत घालतात
त्यांनाही कळत असेल काय?
माझ्या अंतरंगाचे कोडे
मी बाहेर पडेपर्यंत थांबतात
अन्‌ लगेच येऊन लगबगीने
भिजवतात मला पावसाच्या सरी
जणू तुझ्या विचारांपासुन
त्या मला अलिप्त करु पाहतात
निसर्गाचे ऋन मजवर मोठे
एकटा मी फेडणार कसे ?
त्यासाठी तुझ्या मदतीची आहे आस

           किरण क्षीरसागर