Reply – समजाव तुझ्या आई बाबांना
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
समजाव तुझ्या आई बाबांना
— by Sameer Nikam Sameer Nikam
समजाव तुझ्या आई बाबांना

लपून छपून भेटण्यात नाही उरला आता अर्थ
समजाव तुझ्या आई , बाबांना
कर म्हणाव तुझ जीवन आता सार्थ
 
झाले तुझे वय हात पिवळे करण्याचे,
समजाव तुझ्या आई बाबांना...
होतात केस पांढरे प्रियकराचे .

कशाला करताय उघाच पोरकट हट्ट
समजाव तुझ्या आई बाबांना
आता तरी बांदू दे आपल्याला जीवनाची गाट घट्ट

नको त्रास आता गपचूप भेटण्याचा,
समजाव तुझ्या आई बाबांना
उरला नाही रस  आता त्यात आम्हाला भांडण्याचा,
 
करावे आतातरी तुझे त्यांनी  कन्यादान
समजाव तुझ्या आई बाबांना
नाही होणार समाजात खाली त्यांची मान

एकदा जर का वय गेले तुझे सरून,
समजाव तुझ्या आई बाबांना
देतील ताने समाज भरून भरून,

नाही उपयोग आता जास्त वेळ थांबून,
समजाव तुझ्या आई बाबांना
जगबुडी ही देखील येईल कधीही धावून,

जाती रूढी परंपरा नवे नाही समाजाला
समजाव तुझ्या आई बाबांना
प्रेम करणारे देखील नाही घाबरले कोणाच्या बापाला  

बस कर आता नको जीवाला अधिक ध्यास,
चल जाऊ पळून लांब कोठेतरी
सोसू दे कि आई बाबांना हि थोडा त्रास..