Reply – आई तू आईच
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
आई तू आईच
— by Kiran Kshirsagar Kiran Kshirsagar
  आई तू आईच

आई तू आईच
तुजवाचून दुसरे नाही
तुजसारखे महान
या जगती काही नाही
आई चालण्यास तु
बोट धरुनी शिकविले
अक्षर ओळख करवितांना
हाती हात धरुनी गिरविले
आई तुझी ममता
आहे हॄदयस्पर्शी
ती शोधण्याला
हवी कशाला दुरदर्शी
आई तुझा कानमंत्र
आहे अजून स्मरणात
तो विसरलो तर
जीव माझा मरणात
आई तुझे आयुष्य
तु मजसाठी वेचले
आम्हास घडवितांना
तु फार श्रम ओतले
आई तुझ्यामुळे हे
जीवन झाले सोने
तुझा उतराई होण्यास
कशातुन काय करु उणे

     किरण क्षीरसागर