Reply – सोनेरी लेप
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
सोनेरी लेप
— by Kiran Kshirsagar Kiran Kshirsagar
  सोनेरी लेप
ढेकळं तुडवित जातात
अनवाणी पावलं
मातीत सोनं शोधण्याला
ढेकळांवरुन घसरुन पाय
रक्तबंबाळ होतात
पायांचे नाजूक तळवे
रक्त माखते मातीला
अन्‌ मातीलाच येतो
सोनेरी रंग
जखमेवर चढविला जातो
त्याच मातीचा सोनेरी लेप
पुढे चालत राहण्याला
वाळल्यावर गळून पडतो
लेप तो सोनेरी
निराश, हताश होऊन
त्याच मार्गाने परततांना
चमकतो गळालेला सोनेरी लेप
मन प्रसन्न होऊन धावते
त्याला उचलण्यासाठी
पुन्हा घसरतो पाय
धडपडत उचलतो तेव्हा
पुन्हा होते घोर निराशा
जखमी तळवे पुन्हा चिघळतात
सोन्याचा ध्यास सोडून
चंदन शोधू लागतात

      किरण क्षीरसागर