Reply – काळजी
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
काळजी
— by Kiran Kshirsagar Kiran Kshirsagar
काळजी

असा अविचारी राहुन
असा ओंगळ रे वागुन
का राहतोस बाळा दु:खी
अन्‌ करतोस मलाही दु:खी
आता का तु लहान ?
किती करु सांग चिंता?
तुझ्या काळजीने रे बाळा
जळेल आपोआप माझी चिता
सावर स्वत:ला वेंधळ्या
कर सुखी माझा प्राण
नको जाऊ सोडून घरटे
ऊब मिळणार नाही कुठे
थंडी गारठयात जीव टांगणीला
माझाही इथे तुझ्यासारखाच
जीव पोळला रे माझा
तुझ्या काळजीने खूप आता
स्वत:च स्वत:ची तू
कर काळ्जी आता
कर मलाही काळजीमुक्त
जळून खाक होण्याआधी
मार फुंकर ओली त्यावर

किरण क्षीरसागर, नासिक