Reply – सप्तरंगी आयुष्य
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
सप्तरंगी आयुष्य
— by Kiran Kshirsagar Kiran Kshirsagar
सप्तरंगी आयुष्य

सप्तरंगी आयुष्याचा
घोळ मी घातला
त्यासाठी कुठून कुठून
रंग मिळविण्याचा
बेत मी आखला
सुर्याजवळ मागितला मी
सोनेरी किरणांनी
मढविलेला सुवर्णमुकुट
आकाशाला घातली गवसणी
निळ्या निळ्या दुलईसाठी
चंद्र,चांदण्यांस सांगितले
शुभ्र प्रकाश देण्यास
वनश्रीला विनवले
गर्द हिरव्या वस्त्रांसाठी
लाल रंग मिळविन
रक्त स्वत:चे सांडवून
तांबड्या मातीस पुजले
गुलालाची उधळण करण्या
रंग गुलाबी मिळविण्याला
गुलाबांची लाविन ताटी
रंगीबेरंगी पशु पक्ष्यांशी
करेन मी खुप दोस्ती
बागडणारी फुलपाखरे
बागेत बोलविन माझ्या
अंगावर काळा थर,
मळालेली फाटकी लक्तरे,
परिधान करुन गावभर
भिक मागत हिंडणार्‍या
निरागस बालकांना बोलावून
स्वच्छ करेन त्यांना
रंगहिन पाण्याच्या मदतीने
भीक घालुन ज्ञानाची
अंधार काळाकुट्ट दूर करेन
अशुभ काळ्या रंगावर
पांढरा शुभ्र थर देईन
कुणास देईन सुवर्णमुकुट
तर कुणाला निळी दुलई
कुणाला काय तर कुणाला काय
सांगेन मंत्र त्यांनाही
सप्तरंग मिळविण्याचा
आयुष्यचित्र रंगविण्याला

किरण क्षीरसागर