Reply – स्वार्थ
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
स्वार्थ
— by Kiran Kshirsagar Kiran Kshirsagar
स्वार्थ

स्वार्थी या जगात आजच्या
माणुसकीला नाही अर्थ
कोण कुणास्तव धजतो येथे?
जो तो बघतो स्वार्थ
स्वार्थ असावा जरुर आज
पण प्रेमभाषा विसरु नये
स्वार्थालाही मर्यादा असावी
व्यवहार प्रेमाचा करु नये
प्रेम असते पवित्र बंधन
स्वार्थाने त्यास तोडू नये
प्रेम असते अतुट नाते
स्वार्थापायी तोलू नये
सार्थ सारे जावे विसरुनी
माणुसकीचे दर्शन घडावे
प्रेम घेवुनी प्रेम देवुनी
मनोमिलन घडवावे

किरण क्षीरसागर