Reply – चंदेरी दुलई
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
चंदेरी दुलई
— by Kiran Kshirsagar Kiran Kshirsagar
 चंदेरी दुलई

हिरव्या गालिच्यांवर झोपून
नभ निळे पांघरले मी
घेतली अंगावर ओढून
नक्षी चंदेरी चांदण्यांची मी
थंडी गुलाबी होती म्हणुन
उब चांदण्यांची घेतली मी
स्वप्न पडले पहाटे छान
चांदण्यांशी खेळतो मी
सवंगडी सारे गेले पळून
एकटाच खेळत होतो मी
विसरलो होतो तहान भूक
त्यांच्याशी खेळतांना मी
रम्य सकाळी उठलो तेव्हा
शांतपणे राहीलो बसुन
खुप नाराज होऊन मी
कारण नेली होती कुणीतरी
ओढुन माझी चंदेरी दुलई

           किरण क्षीरसागर