Reply – मंत्र सुखाचा
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
मंत्र सुखाचा
— by Kiran Kshirsagar Kiran Kshirsagar
   मंत्र सुखाचा
कोण कसा जोडेन संदर्भ
जो तो आपआपल्या मनाने
आपण मात्र चालत रहावे
आपल्याच सरळ वाटेने

हटकतील, हेटाळतील
दुर्लक्ष करावे साफ
वाईट वर्तले तरीही
करुन टाकवे माफ

राग, द्वेष, हेवा, मत्सर
नसतो काही अर्थ
त्याच्यातच अडकुन बसता
आयुष्य जाते व्यर्थ

सुख असते तोकडे
मिळविले खुप जरी
समाधान बाळगत रहावे
सदैव आपल्या उरी

मंत्र हाच एक सुखाचा
प्रत्येकाने बोध करावा
आपण आपल्या कर्माने
किर्तीरुपी सुगंध पेरावा

               किरण क्षीरसागर.