Reply – शब्द सरिता
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
शब्द सरिता
— by Kiran Kshirsagar Kiran Kshirsagar
  शब्द सरिता
शब्द सरिता वाहते
खळाळते माझ्या अंगणी
उगम मनातुन पावते
सळसळते काव्यामधुनी

पर्जन्य मनात दाटतो
शब्दांचाच येतो पुर
निसर्ग जेव्हा बहरतो
काव्यातुन उमटतो सुर

शब्द असती भारावलेले
काव्य होऊन वाहता
डोळे असती पाणावलेले
शब्द काव्याचे अनुभवता

शब्द सरिता सामावेल
मरणाच्याच महासागरात
शब्द तरिही उरतील
काव्यरुपी शिंपल्यात

             किरण क्षीरसागर