Reply – वेड मनाला
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
वेड मनाला
— by Kiran Kshirsagar Kiran Kshirsagar
   वेड मनाला

अवखळ हास्य ठसे मनाला
लडिवाळ वागणे भिडे हृदयाला
पत्येक आठवण तुझी अशी
करी घायाळ माझ्या जिवाला

स्पर्श गोजिरा मादक असा
देहभान विसरविणारा
पत्येक क्षणाला वाढते अधिरता
दुरावतो आपण जेव्हा

वेड मनाला तुझ्या प्रितिचे
अन्‌ आस मनी सहवासाची
का लटका राग धरी मनाशी
भाव तुझ्या अंतरिचे कळु दे जरा

मनात तुझ्या भिती जगाची
म्हणुन धरशी अबोला मजशी
कर उधळण तु तुझ्या प्रितीची
कवटाळुन घे मग आठवणी उराशी

           किरण क्षीरसागर