Reply – सृष्टीच्या उद्यानात
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
सृष्टीच्या उद्यानात
— by Kiran Kshirsagar Kiran Kshirsagar
 सृष्टीच्या उद्यानात

सृष्टीच्या भव्य उद्यानात
फुलली सुगंधी फुले
भिरभिरणारी फुलपाखरे
त्यावरी स्वच्छंदी डुले

विविध रंगांच्या नाना छटा
दोघांनीही वर पांघरल्या
कुणी रंगाने, कुणी गंधाने
चौफेर सगळ्या विखुरल्या

हिरव्या हिरव्या तृणांकुरावर
दवबिंदुंचे चमकती हिरे
उंच नभाच्या पटलावरती
फेर धरुनी विहरती पाखरे

साथ संगत करु चला
आपणही त्या सृजनांना
भान तरी हवे राखायला
निसर्गातील हर्ष लुटतांना

         किरण क्षीरसागर