Reply – पाऊस आणि गारवा
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
पाऊस आणि गारवा
— by Kiran Kshirsagar Kiran Kshirsagar
  पाऊस आणि गारवा

उरी गारव्याचा हा भार झाला
आणि पावसाने कहरच केला
येवुन त्याने आपुल्याच रंगा
चिंब भिजविले माझ्या सर्वांगा

थंडीने तर मी हुडहुडलो
माझ्याच मनाशी पुटपुटलो
बरेच झाले रचतील कहाण्या
कुशीत तुझ्या हळुच शिरण्या

होईल हलका हा भार आता
मिठीत तुझ्या हरवुन जाता
गारव्यास दुरुनच दाखविन ठेंगा
खुशाल करु दे पावसास दंगा

               किरण क्षीरसागर