Reply – तु त्यांना
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
तु त्यांना
— by Kiran Kshirsagar Kiran Kshirsagar
     तु त्यांना

माळुन ये तु मोहक गजरा
खिळतील  तुझ्यावर अनेक नजरा
भिडवु नको नजर त्या नजरांना
उडवुन लाव वरचेवर त्यांना

तुझा तुच कर साजरा
तुझ्या मनस्वी आनंदाचा फुलोरा
लुटावया धावतिल ते तो खजाना
उधळुन लाव सहजपणे त्यांना

चुकवुन आलीस तु तो पहारा
देवु करतील आता सहारा
घेवु नको त्यास सांग बहाणा
फटकुन लाव तसेच त्यांना

मिळेल तुलाही आधार खरा
वाहत येईल प्रेमाचा झरा
स्विकार कर तु त्या भावना
जिव्हाळा लाव हळुवार त्यांना

              किरण क्षीरसागर