Reply – पीठ भाकरीचं एका
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
पीठ भाकरीचं एका
— by Kiran Kshirsagar Kiran Kshirsagar
पीठ भाकरीचं एका

पीठ भाकरीचं एका
एक भाकर थापली
चुलीत मारुन फुका
भाकर तव्यावर टाकली

पोर रडलं झोळीत
माय लगेच धावली
त्यास झोळीतुन काढत
मांडीवर पाजु लागली

गोवरी शेवटची होती
खुप दमानं पेटली
ज्वाला धगधगली होती
तिनं भाकर जाळली

अंगणी खेळुन आलं
दमुन भागुन घरात
पोर दुसरं भुकेलेलं
भुक मावेना पोटात

मागु लागलं भाकरी
पिळलेले हात पाय
माय कावरी बावरी
समजेना करावे काय

    किरण क्षीरसागर