Reply – संकटांची मालिका
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
संकटांची मालिका
— by Kiran Kshirsagar Kiran Kshirsagar

   संकटांची मालिका

आकाश कालेकुट्ट भरुन येते
मनात भितीचे काहुर उठते
कडकडाट होती विजांचे
थैमान मनात सुरु विचारांचे

उंच वाढलेली पिकं शेतात
निसरडया बांधावरुन जाता
सळसळतात गवताची पाती
फुटती शहारे अंगावरती

वरुन सरी भिजवती अंगा
गारवारा झोंबतो सर्वांगा
घरी जायची असते घाय
बांधावरुन निसटती पाय

चिखल माखतो अंगाला
होतो ओझ्याचा भार डोईला
सावरुन सावरुन भले चालतो
मध्येच भसकन्‌ काटा रुततो

आसपास ना कुणी सहारा
चिखलात मिसळती रक्ताच्या धारा
सुरु होते जणू मालिका
संकटांची एकामागुन एका

      किरण क्षीरसागर