Reply – माझा तान्हा
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
माझा तान्हा
— by Kiran Kshirsagar Kiran Kshirsagar
  माझा तान्हा

आई आई म्हणुनी तान्हा
हाक मारतो बाई
अभिमानाने पुन्हा पुन्हा
उर भरुनी येई
छंद त्याचा मला लागला
मी न उरते काही
लळा माझा त्यास लागला
माझ्याशिवाय रहात नाही
नजरेआड होतो कधी
करमत नाही मला
दुर कुठे जाण्याआधी
शोधुन आणते त्याला
हुशार खुप आहे तो
अनुकरतो हुबेहुब
आज्ञापालन करतो
सांगत नाही सबब
हृदयस्पर्शी माझी ममता
स्पर्शाने फुटतो पान्हा
मी त्यास पाजत असता
झोपी जातसे तान्हा
मी होईन महान माता
शिकवुन त्याला जगतज्ञान
तो होईल जगजेत्ता
राखील या ममतेचा मान.


        किरण क्षीरसागर.