Reply – आईची माया
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
आईची माया
— by Kiran Kshirsagar Kiran Kshirsagar

    आईची माया

आई तु अजुनही
आहेस किती हळवी
तुला दुर सारुनही
जीव आमच्याशी गुंतवी

माया तुझी सारखीच
प्रत्येक लेकरासाठी
आशिर्वाद तुझा एकच
असतो सर्वांच्या पाठी

आम्ही विसरतो अनेकदा
उपकार तुझे सगळे
जातो निघुन कितीदा
सोडुन तुला वेगळे

प्रतिक्षा तरीही करते
आम्ही तुला भेटण्याची
जेव्हा हेही शक्य नसते
अपेक्षिते चिठ्ठी दोन बोटांची

तु बळ दिले पंखांना
आकाशी ऊंच विहारण्या
आम्ही विसरलो भावना
तुझ्या त्या साकारण्या

       किरण क्षीरसागर.