Reply – कसे बरे विसरतो आम्ही
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
कसे बरे विसरतो आम्ही
— by Kiran Kshirsagar Kiran Kshirsagar

  कसे बरे विसरतो आम्ही

कसे बरे विसरतो आम्ही
राम रहीम एकच आहे
हिन्दु मुस्लिम बांधव आम्ही
भारत आमचा एकच आहे

कसे बरे विसरतो आम्ही
परका शत्रु चिथवतो आहे
आपसात भांडुन आम्ही
वैर घरात वाढवतो आहे

कसे बरे विसरतो आम्ही
मानव धर्म एकच आहे
जातीभेद मांडुन आम्ही
बांधव दुर लोटतो आहे

कसे बरे विसरतो आम्ही
रक्त आमचे एकच आहे
तरी अमानुष होवुन आम्ही
सडे रक्ताचे सांडतो आहे

किती सहज विसरतो आम्ही
सारे काही दिसत असुनी
डोळे मिटुनी घेतो आम्ही
म्हणुन आस्तित्व आमचे मरणालागुनी

          किरण क्षीरसागर.