Reply – हे ईश्वरा !
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
हे ईश्वरा !
— by Kiran Kshirsagar Kiran Kshirsagar
हे ईश्वरा !

हे ईश्वरा !
तु तरी सांग तुला
इथेच का रहायचे?
जिथे आजवर अनेक
दिलेत निष्पाप बळी
पडलेत रक्ताचे सडे
अन्‌ बांधवच झाले वैरी
राजनिती इथली आंधळी
आगीत तेल ओतत असते
भडका होतो असे पाहुनी
स्वत:स मागे ओढुन घेते
विर हनुमाणाने जसे तुला
अंतरंगात साठविले होते
प्रत्येकाने तसेच तुला
अंतरंगात साठवावे
मन मंदिरात बसवुन तुला
तुझ्याशिच एकरुप व्हावे
सर्वांसाठी एकच रहा तु
नको तुला विविध नावे
मंदिर,मस्जिद नको तुला
तु आहेस सदैव निराकार
सुख शाती नित्य वसु दे
तुझ्याच हाती ठेव
या जगाचा कारभार.

       किरण क्षीरसागर.