Reply – असा संसार सुरेख
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
असा संसार सुरेख
— by मनिषा नाईक (माऊ) मनिषा नाईक (माऊ)
असा संसार सुरेख
रोज मनाला चटके
वर बसावे फटके
माझे माय ||१ ||

असा संसार सुरेख
जसा भरलेला माठ
ओला पापणीचा काठ
माझे माय ||२||

असा संसार सुरेख
मांडलेला एक डाव
रोजचा गं नवा घाव
माझे माय ||३||

असा संसार सुरेख
जसा सागराचा तळ
पाठीवर रोज वळ
माझे माय ||४||

असा संसार सुरेख
दोन जीवांचा हा मेळ
नसे कधी ताळमेळ
माझे माय ||५ ||

असा संसार सुरेख
जशी तडलेली काच
मला सुखाचा गं जाच
माझे माय ||६||

असा संसार सुरेख
जसे गाडीचे गं चाक
घरदार घाली धाक
माझे माय ||७||

असा संसार सुरेख
काळजाला पडे चीर
माझा खचला गं धीर
माझे माय ||८||

असा संसार सुरेख
जशी दावणीला गाय
पोळले गं माझे पाय
माझे माय ||९ ||

असा संसार सुरेख
वाट वाकडी काटेरी
मला बोलवा माहेरी
माझे माय ||१० ||

मनिषा नाईक (माऊ )
दि. ४.०७.२०१२