Reply – मी आणि ती
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
मी आणि ती
— by पल्लवी सावंत पल्लवी सावंत
       'मी' आणि 'ती'

'मी' नक्की कोण?प्रश्न नेहमी सतावतो,
दोन 'मीं'च्या भांडणात.. अदृश्य 'मी'च भावतो!
मला 'मी' म्हटलं ;तर दुसरीला 'ती' म्हणू?
सूर असले माझे;तरी वाजवते तीच वेणू!
मी शांत असले की..तिची अखंड बडबड'
एकदम आगाउपणा करण्याची;तिची नेहमीचीच धडपड।
मी म्हटलं नाही; की ती म्हणणार 'हो'.
माझ्या अस्वस्थ मौनात तिचा नेहमीचाच टाहो।
माझ कौतुक झालं;की ती खडबडून जागी होते.
म्हणते, हुरळून जाऊ नको  गं;हे सारे आहे थिटे।
दिला कुणी कधी..जिव्हारी लागणारा घाव...
तीच उत्साहाने सांगणं;झेल झेल तो. यांचा असायलाच  हवा सराव।
मी कुणावर हसले;की ती माझ्यावर हसते,
या विचित्र गुंत्यात मी नेहमीच फसते।
मी क्षितिजाकडे पाहताना..ती क्षितिजापार जाते,
मी ओंजळ चाचपताना..ती दुथडीभरून वाहते।
मला ठेच लागली की ती म्हणते व्वा!!
झाला सुरु वाटतं..हिचा प्रयत्न नवा!
यावेळी होईल न पूर्ण? ती म्हणायचं म्हणून म्हणते,
तिच्या या शंकेने मी मनातल्या मनात कण्हते।
माझ खचलेपण तिला अनेकदा जाचतं,
कारणमीमांसा करताना तिचं-माझं नेहमीच वाजतं।
माझी तिची आहे प्रत्येक श्वासागणिक भेट,
कनेक्शनच आहे हो आमचं.. पारदर्शी..थेट!
मला निर्णयाप्रत पोहोचवणं  तीच ठरलेलं काम आहे,
माझ्या अविवेकी वेगावर तिचा संयमी लगाम आहे।

                         -पल्लवी सावंत