Reply – मला आताशा कविता करायचीच लाज वाटू लागलीय .
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
मला आताशा कविता करायचीच लाज वाटू लागलीय .
— by naamagumjaayegaa naamagumjaayegaa

तुझ्या गालावरच्या खळीने
एक धुंद कविता सुचली बघ मला

पण लिहू गेलो कागदावर
तर दिसल्या असंख्य खळ्या
चुरगाळलेल्या जन्माआधीच
गर्भजलपरिक्षेत नापास झालेल्या....
मला लाज वाटली गं खळीवर कविता करायची

तुझ्या ओठांवरच्या गुलाबांच्या लालीत
मला दिसू लागलं ते गोठलेलं रक्त
जन्मतःच दम तोडणार्या अर्भकाचं
त्या बालिकेचे दूध शोधणारे ओलसर ओठ...
मला शरम वाटली गं ओठांवर कविता करायची

तुझ्या भांगाखालचा सिंदूरी सूर्य बघताना
मला दिसल्या सासुरवाशिणी
हुंड्यासाठी मुकं दुःख भोगणार्या...

तुझ्या मातृत्त्वावर कविता लिहू गेलो
तर दिसल्या माता
"मुलगाच" व्हावा म्हणून नवस करणार्या
स्वतःच्या स्त्रीपणाची हौस भागलेल्या...

तुझ्या वैश्विक शक्तीचा जप करताना
मला दिसतात
बांगला देशात बुरखा न घालणार्या मुलींवर पडणारे दगड
..हे हात आता हैदराबादेतही पोचलेत म्हणे...
नेपाळ मलेशियात विकल्या जाणार्या मुली
उझबेकिस्तानातून निर्यात होणार्या
पॅरिसच्या "झगमगीत" अंधारात ...

मी तुझ्यावर कविता करतो...
तुझी खळी, तुझे डोळे, तुझे ओठ, तुझे केस ...
तुला हरभर्याच्या झाडावर चढवतो
तुझी पूजा
तुझे दिन साजरे करतो
तुला वाटत असेल
"मी तर जगातली अनमोल चीज झालेय..."

कुणाला फ़सवतोय मी ?
तुला ?
जगाला ?
कि स्वतःला ?

मला आताशा कविता करायचीच लाज वाटू लागलीय .
खरं तर...
मला आता माणूस म्हणवण्याचीच लाज वाटू लागलीय.