Reply – तो एक क्षण
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
तो एक क्षण
— by मनिषा नाईक (माऊ) मनिषा नाईक (माऊ)
तो एक क्षण

 

टपटपणारे दोन डोळे,

आणि चौकटीत बंद 'मी'

.

.

.

 

चष्म्या मागले अश्रू पुसत

अलगद हात फिरवलास

त्या काचेच्या निर्जीव

फ्रेम वरून...........,

 

मग भिंतीवर मधोमध

तुला रोज समोर दिसेल अशी

टांगलीस 'ती' तुझ्याच खोलीत.

हार घातलास पुन्हा गळ्यात,

तेव्हा घातला होतास ना........

अगदी  तसाच ....!

फरक इतकाच ....

तो फुलांचा होता हा चंदनाचा.

 

पण खर सांगू ...?

 

संपूर्ण सुख अनुभवल मी

त्या एका क्षणात....!

 

तुझ्या डोळ्यात

मला हव असलेल प्रेम  

स्पर्शात ओघळती माया

आणि तुझ्या हृदयात खोल खोल जागा

सगळे सगळे मिळाले........

 त्या एका क्षणात ...!

 

माझ्या निर्जीव देहाचा

कण कण रोमांचित झाला

 

ज्या एका क्षणासाठी

संपूर्ण आयुष्य जगून मेले

तोच तर हा 'क्षण'

 

खर्या अर्थाने आज मी जगले

आयुष्य संपल्यावर.....!

 

खरच...

 

शेवटा नंतरच होते का

खरी सुरुवात ???

 

 

मनिषा नाईक (माऊ )