Reply – बंदिवान
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
बंदिवान
— by naamagumjaayegaa naamagumjaayegaa
बंदिवान
माझं मन झालं बंदी , तुझा कैदखाना
जन्मठेप झाली,आता, होईन रवाना

अपीलाला वाव नाही ठेवला कुठेही
एक एक आरोपाचा शब्द शब्द सही
नाही साक्ष , ना पुरावा, वकील मिळेना
माझं मन झालं बंदी , तुझा कैदखाना

फ़ोडू जाता नाही भिंत, छिन्नी करी काय ?
नाही गज, नाही ताळें, काही ना उपाय.
पिंज-याला शब्द दोन " लवकर ये ना "
माझं मन झालं बंदी , तुझा कैदखाना

दोरखंड असा जाड रुते खोल खोल
कोणतीच दिशा नसे, पळणेही फ़ोल
चारी दिशा, वर खाली, तुझाच ठिकाणा
माझं मन झालं बंदी , तुझा कैदखाना

नाम