Reply – गदगद
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
गदगद
— by मार्गस्थ उषेचा (भूषण महाजन) मार्गस्थ उषेचा (भूषण महाजन)

माझे गढूळ काळीज,
रात गळते एकाकी.
चांद ओल्या त्या डोळ्यात
कशी जळते लकाकी.

वाट पाउल पाउल
देतो मृदुगंध हुल
नाद करतो पिंपळ
नाही पहावे चकाकी.

साद घालतो किनारा
लाटांसंगे जगे वारा
धडधड ही दिशेला
फ़डफ़ड ती पताकी!

झाली घरामधे धुळं
घे गं आवरून आई
आज आडोशी ढगाला
किती गदगद होई.


-भुराम
१६-०४-२०१२