Reply – विसरून जात आहे
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
विसरून जात आहे
— by क्रांति क्रांति
हल्लीच मी जराशी बदलून जात आहे
लक्षात ठेवण्याचे विसरून जात आहे

प्राजक्तगंध नाही उरला लुटावयाला
अस्तित्वगंध माझा विखरून जात आहे

नैराश्यकाजळीच्या पडद्यात लोपलेल्या
वाटा उदासवाण्या वगळून जात आहे

देण्यासमान हाती नव्हतेच फार काही
आयुष्य फक्त माझे उधळून जात आहे

आता तहान नाही शमणार या सरींनी
तू थांब श्रावणा, मी बरसून जात आहे

होते फुलायचे की सुकणेच भाग होते?
आता नकोत चर्चा, बहरून जात आहे

क्रांति