Reply – तिची सावली तिचा भास
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
तिची सावली तिचा भास
— by Kavita Mokashi Kavita Mokashi
तिची सावली आणि तिचा भास
म्हणजेच आकाश
तिच्याच बहीर्गोल आरशाची
बेढब प्रतिमा
म्हणजे क्षितीज
तिच्या आसवांची वाफ
म्हणजेच पाऊस
ती मात्र अजुन आस लावते वेडी
कधीतरी तिच्या अंतरीचा जीवलग
तिला भेटेल म्हणून
कोण समजुत घालेल तिला
तो अनंत आहे
एखाद्या अपराध्यासारखा
ब्रम्हांड विश्वाएवढा

तिची सावली आणि तिचा भास
म्हणजे आकाश


-----कविता