Reply – रानातील वाट
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
रानातील वाट
— by Madhura Khalatkar Madhura Khalatkar
शांत अशा प्रातःकाली
रानातील ती वाट असावी
अलगद थंडगार वाऱ्याची
शाल रानाने पांघरावी

हळू हळू सूर्याची किरणे
पाना आडून डोकवावी
रानातील त्या वाटेवरती
किरणांची चादर पसरावी

शांत शांत रानात त्या
पक्ष्यांची किलबिल व्हावी
ती तांबडी सूर्याची किरणे
हळू हळू पिवळी व्हावी

दिन हा माध्यान्हासी आला
सूर्य जरी तळपू लागला
घनदाट अशा त्या रानातूनी
शीतल अशी छाया मिळावी

सूर्य आता मावळतीला आला
पक्षी परते घरट्याकडे अपुल्या
पानांच्या आडूनी आता
चंद्राची ती कोर दिसावी

रानातील त्या वाटेवरती
तिमिराचे साम्राज्य पसरावे
रातकिड्यांच्या किरकिरण्यातही
रानाला आता निद्रा यावीमधुरा खळतकर