Reply – आज पुन्हा तुझी आठवण आली, आज पुन्हा कंठ दाटला
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
आज पुन्हा तुझी आठवण आली, आज पुन्हा कंठ दाटला
— by rajarmarkar rajarmarkar
आज पुन्हा तुझी आठवण आली, आज पुन्हा कंठ दाटला.
पुन्हा आज त्या रस्त्याच्या खुणा बोलू लागल्या
पुन्हा माझ्या शब्दसागराला ग्रीष्म ग्रासला .
 
माझ्या मनातल्या अमावसेला चांदण्याचा त्रास का ?
काळ गेला  निघुनी बराच , तुला दूर जाउनी  ,
तरी या मनात तू अजूनही तशीच का ?
 
छिन्न  केले भिन्न केले मनातल्या चित्राचे एक एक तुकडे केले.
प्रत्येक एका तुकडातल्या तुझ्या स्मुर्तीवर पुन्हा मी तेवढेच प्रेम केले.
 
मी असे का केले तू तसे का केले.तुझी चुकी कि माझी चुकी,
असल्या सगळ्या प्रश्नसुनामीत अडकत गेलो.
या सुनामितून सुटलो कसातरी ,  तरी आपल्या प्रेम्बंधानातून सुटू कसा ?
हा प्रश्न मी सोडऊ कसा ? या वेड्या मनाला सांगू कसा?
तुझी आठवण विसरू कसा ?
 
वेड मन
राहुल
 