Reply – सलाम......
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
सलाम......
— by amolskumbhar@gmail.com amolskumbhar@gmail.com

सलाम......


आलेल्या प्रत्येक क्षणाला, मनातल्या झळांना

गोड तुझ्या आठवाला, विरहाच्या कळाना

मधुर सुगंधी सहवासाला, मिठीतल्या फुलांना

तुझ्या हळूवार स्पंदनाला, भारावलेल्या श्वासाला

सलाम......

 

रात्रीच्या त्या शापांना, दिवसाच्या स्वप्नांना

पळालो त्या वाटाना, वाटेतील सोनेरी कट्याना

गडबडलो जिथे त्या फाट्याना, सावरले त्या पट्याना

सांभाळले त्या खांद्याना, विसरलो जिथे त्या फांद्याना

सलाम......

 

भेटलेल्या लोकांना, माणसातील पशूंना

डावातील कपटाना, पाठीवरल्या हातांना

झुकलेल्या मस्तकाला, क्षमाशील मनांना

ठोकरलेल्या लाथाना, भिजलेल्या डोळ्यांना

सलाम

 

माझ्यातल्या मी ला, तुझ्यातल्या तुला

भोगलेल्या कौतुकाला, भिरकवलेल्या शिवीला

माथ्यावरच्या सुर्याला, मिट्ट काळोख्या रातीला

डोळ्यात फेकलेल्या धुळीला, मिळाली स्वप्ने त्या मातीला

सलाम.......

 

आलेल्या नाजुक मोक्याला, मिळालेल्या जबर धोक्याला

मारलेल्या तुझ्या हाकेला, चुकलेल्या त्या ठोक्याला

समाजाच्या धाकेला, नि जखमी त्या डोक्याला

जगण्याच्या या भिकेला, लाचार सोसलेल्या टिकेला

सलाम........

 

आता येईल त्या दिवसांना, बोलवणार्या हाताला

वाट पाहणार्या डोळ्यांना, खुणावणार्या नजरेला

धाऊ  पाहणार्या पायांना, वाट  पाहणार्या  घराला

मनातील भयाण भीतीना, जगू  पाहणार्या  जिवाला

सलाम........

अमोल कुंभार ०१-०१-२०१२
कधी सांजवेळी........