"देवकण" ( गॉड पार्टिकल )

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

"देवकण" ( गॉड पार्टिकल )

Kiran Kshirsagar
       "देवकण" ( गॉड पार्टिकल )

तुम्ही बापडे उलगडण्या निघाले
सृष्टीच्या निर्मितीचे कोडे
मान्य नाही तुम्हास हे देवाचे देणे
नाही घालत म्हणुन तुम्ही त्यास साकडे
विज्ञाननिष्ठ समजता स्वत:ला
सुक्ष्म कणांत शोधता सृष्टी
खटाटोप करुनी वेगळा
आव्हानच देता तुम्ही देवाला
विज्ञाननिष्ठ आहोत आम्हीही
तसेच आहोत ईश्वरनिष्ठही
पर्वत,नद्या,महासागरे,जल,वायु,अग्नी,
सुर्य,चंद्र,ग्रह,तारे आणि आकाश
मार्ग आपला सारेच क्रमिती अचुक
काय,कसे आणि कोण करी नियंत्रीत?
मान्य आहे सृष्टी बनली कणा कणांची
सुख,दु:ख,प्रेम,भावना कोण जननी यांची?
अध्याय गीतेचे शिकलो आम्ही
त्या भगवंताने आम्हा शिकविले
मी चालविता सृष्टी चालते, वारा वाहतो,
पाने हलतात, सुर्य उगवतो, पाउस पडतो
सृष्टिचा हा भव्य पसारा आहे अगदी
तुमच्या आमच्या आकलना पलिकडे
तो समजण्यासाठी त्यालाच घाला साकडे
तल्लिन व्हा भगवंताच्या भक्तीरसात
गुढ रहस्य उलगडेल त्याच्याच सानिध्यात
रात्रंदिवस मेहनत करुन शोध घेतला
तुम्ही त्या सुक्ष्म कणांचा आणि केला दावा
अस्तित्व त्याचे मान्य नसुनही नाव दिले
"देवकण" ( गॉड पार्टिकल )असे कसे त्याला ?

                          किरण क्षीरसागर.