poem- sundar

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

poem- sundar

JAYANT GORE
सुंदर:-
सुंदर दिसायला
खूप लागतं नटायला
सुंदर वागायला
खूप लागतं समजायला
सुंदर समजायला
खूप लागतं जाणवायला
सुंदर जाणवायला
खूप लागतं शिकायला
सुंदर शिकायला
खूप लागतं वाचायला
सुंदर वाचायला
वाढवावं लागतं ज्ञानाला
सुंदर ज्ञानाला
सारावं लागतं अज्ञानाला !!-जयंत