marathi kavita...

classic Classic list List threaded Threaded
5 messages Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

marathi kavita...

pooja
बोट...
ती जोपर्यंत जमिनीवर असते तोपर्यंत ती अशीच निश्चल पडून असते...
पण जेंव्हा ती पाण्यात उतरते तेंव्हा ती तरंगायला लागते...
हळूहळू का होईना पण प्रवाहाच्या दिशेने वाहायला लागते...

आयुष्यात पण आपल्याला दोन प्रकारची माणसं भेटतात...
पहिली त्या जमिनीसारखी असतात...
ती आपल्या आयुष्यात येतात... त्यांच्या सहवासात, दिवस, महिने, वर्ष सरत जातात पण आपण जिथल्या तिथेच असतो..

अन दुसरे.. दुसरे त्या पाण्यासारखे असतात...
आपल्याला स्वतःच्या प्रवाहात वाहून घेणारे...
त्यांच्या सहवासात आपण डुलत राहतो, तरंगत राहतो...
एक वेगळीच आशा असते त्यांच्या सहवासात... कुठल्यातरी नवीन किनाऱ्यावर पोहोचण्याची...

पण कधी कधी परिस्थिती आपली ताकद दाखवते...
वातावरण बदलते... एक भलं मोठं वादळ येतं... अन सगळं काही अस्ताव्यस्त होऊन जातं...
अश्या वेळी दोनच गोष्टी होतात...
एक तर आपण पूर्णतः बुडून जातो...
आणि जर वाचलोच तर वादळी प्रवाह आपल्याला एखाद्या अज्ञात, अनोळखी बेटावर वाहून नेतो...

"अन तिथून परत येणं हे जवळ जवळ अशक्यच असतं..."
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: marathi kavita...

meenal
अन तिथून परत येणं हे जवळ जवळ अशक्यच असतं

Nivval Apratim..
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: marathi kavita...

भारती सरमळकर
In reply to this post by pooja
खुप सुंदर वर्णन !

मुळात हा विचारच फार अप्रतिम आहे !

लिहित राहा आम्ही वाचत राहू !
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: marathi kavita...

Gourav_Deshpande
In reply to this post by pooja
आपली कविता खरच खूप चांगली आहे. खरच माणूस एकदा सहवासात तरंगायला लागला कि त्याला कशाचेही भान नसते तो फक्त तरंगत असतो. पण जेंव्हा बोट बुडायला लागते तेंव्हा त्याला समजते कि अरे आपण वाचण्यासाठी प्रयत्न करायला हवे होते. पण तो पर्यंत खूप उशीर होतो बोट बुडून गेलेली असते.
तेंव्हा आपण एक तर पूर्णत: बुडतो आणि वाचलो तरी त्या माणसाच्या सहवासाच्या प्रेमाच्या आठवणीत मरुन जातो.
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: marathi kavita...

Ravi
In reply to this post by pooja
Khupch sundr vichar..... Aapn hi asech 1dya pravahat jato...... An to prvah aplyla kute nehun tevel mahit nahi.... Shayd te prem hote ki... Aplya apeksha hotya....hatr 1 moh mah mayajal asto.....