aadvi yete ti jaat

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

aadvi yete ti jaat

Rohidas somwanshi
मेघ बरसूनी दावू लागले,
जणू व्यथा परी माझी...

दुःख त्याचेनी माझे, वाटू लागले सारखे,
न व्हावी भूल कुणाची...

अंतरीचे दुःख हे, वेगळेच आहे,
तरी हि आसवे सारखेच आहे...

आसवे त्याची, अवकाळी बरसली,
मन त्याचे तरसू लागले...

मन माझे ही, झूरू लागले,
वाट प्रेमाची पाहू लागले...

कुठे हरवली माणूसकी
प्रश्न सारखे पडू लागले...

सुख माणसांचे, त्यांच्याच पाई,
मेघ आता शोधू लागले...

गत अशीच माझी, झाली आता,
मन वाट, प्रेमाची पाहू लागले

प्रेम जातीचे वार, झेलू लागले...
प्रेम जातीचे वार, झेलू लागले...

कवी: रोहिदास धनराज सोमवंशी...