Programming Code

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Programming Code

Madhura Khalatkar
कोडयात टाकणारा हा programming code
साधी सरळ वाक्ये सोडून भलताच झोल

एक एक गोष्ट त्याला समजवावी लागते
आपलेच logic कधी कधी आपल्यावर चिडते
errors व exceptions ची नांदी सुरु होते
काही केले तरी हे कोडे नाही सुटते

अथक परिश्रमांनंतर output हवे तसे दिसते
किती ओळींचा code हि क्षुल्लक बाब ठरते
optimization पासून तरी  नाही तुमची सुटका
efficiency नसेल तर code पडतो आडवा

शेवटी सगळे सावरून जेव्हा यश हाती पडते
केलेल्या परिश्रमांचे सार्थक झाल्याचे वाटते
न कळला कुणाला code तरी working सुरु असते
वाक्यं नसलेल्या ABCD वर आपलेच तेवढे प्रेम असते

मधुरा खळतकर