Poem

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Poem

JAYANT GORE
धुंद रात्र :-

अथांग सागरकिनारी
 चाललो होतो आपण
हातात हात घेऊन

दूर अंतरावर
 मुरलीवर वाजत होती
एक छानसी धून

सागराच्या लाटांचा
 खळखळाटी गाज
चालला होता मनापासून

दर्यावर पसरले होते
 मखमली चांदणे
त्यात निघालो न्हाऊन

सागराच्या मध्यभागी होती
 शिडात हवा भरलेली नौका
नाविक गात होता धुंद होऊन

किनारा संपावासा वाटत नव्हता
 रात्र सरावीशी वाटत नव्हती
हात सोडावासा वाटत नव्हता !!-जयंत