POEM

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

POEM

JAYANT GORE
-नातं -

नाळ तुटताचं नातं जडतं आईचं
अस्तित्व असतं ममतेचं , वात्सल्याचं !! १ !!

भावंडांशी नातं जडतं भावा-भावाचं वा भावा-बहिणीचं
अस्तित्व असतं मायेचं ,आपुलकीचं !! २ !!

शालेय जीवनी नातं जडतं मित्रत्वाचं
अस्तित्व असतं मैत्रीचं , विश्वासाचं !! ३ !!

तारुण्यात नातं जडतं प्रेमाचं
अस्तित्व असतं ओढीचं , आकर्षणाचं !! ४ !!

लग्नाच्या वेदीवर नातं जडतं भार्येचं
अस्तित्व असतं जोडीदाराचं , सुखाचं !! ५ !!

अपत्य होताचं नातं जडतं पालकाचं
अस्तित्व असतं जबाबदारीचं , कर्तव्याचं !! ६ !!

नातवंड होताचं नातं जडतं वार्धक्याचं
अस्तित्व असतं लळ्याचं , जिव्हाळ्याचं !! ७ !! -जयंत