POEM

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

POEM

JAYANT GORE
मखमली सौंदर्य :-

तिच्या आगमनाने कळ्यांनी उमलावे
 तिच्या कटाक्षाने सुमनांनीही लाजावे !!

तिच्या प्रेमी ईशा-याने अबोलीस वाटे बोलावे
 तिच्या घटभरल्या देहाने स्वछंदी विहरावे !!

तिच्या ओष्टरुपी अमृताचे प्राशन करावे
 तिच्या  श्वास-उबेचे पांघरुण ल्यावे !!

तिच्या लोभस नजरेचे चुंबनी  स्वागत व्हावे
 तिच्या भालप्रदेशाने गालिचे अंथरावे !!

तिच्या लटक्या रुसव्यात गाली गुलाब रुतावे
 तिच्या मखमली सौंदर्यावरी भाळून जावे !! -जयंत